Marathwada heavy rain: मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ – शेतकऱ्यांचा आक्रोश : "मायबाप सरकार, जागं व्हा… आमचं मरण आलंय…"

मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ – शेतकऱ्यांचा आक्रोश : "मायबाप सरकार, जागं व्हा… आमचं मरण आलंय…"

Marathwada heavy rain: मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ – शेतकऱ्यांचा आक्रोश : "मायबाप सरकार, जागं व्हा… आमचं मरण आलंय…"


गेवराई : मराठवाड्यात सलग पावसामुळे शेतकरी अक्षरशः उध्वस्त झालाय. घरातलं हसू हरवलंय, फक्त रडारड आणि आक्रोश चाललाय. "कापूस गेला, सोयाबीन वाहून गेलं" – असं म्हणत शेतकरी आणि तरुण आपल्या भावना व्यक्त करतायत.


पूरस्थिती का आली?


या ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक वाहून गेलं, जनावरं उपाशी पोटी बसली, संसार उद्ध्वस्त झाला. तरीही सरकारकडून काही ठोस मदत मिळत नाही म्हणून लोकं संतापलेत. "अहो सरकार, डोळे उघडा, आमचं मरण आलंय" – असा हतबल आक्रोश गावागावातून ऐकू येतोय.


दसरा-दीपावलीवर सावट


शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, आणि नेते मात्र खुर्च्या खेळत बसलेत, अशी टीका होतेय. "शेतं वाहून गेली, सरकार मात्र सत्तेत रमलंय", "सत्ता आली तर नेते आपले, संकट आलं की बळीराजा एकटा" – असा असंतोष उसळलाय. "ओला दुष्काळ जाहीर करा", "अजित दादा काहीतरी बोला, तिजोरीचं कुलूप फोडा" – अशा मागण्या जोर धरतायत.


तरुणाईचा संताप


तरुणपणाही संतापला आहे. "खूप पाहिलं जातीसाठी, आता लढूया मातीसाठी", "नेत्यांचे जोडे उचलले, आता बापासाठी उचलूया आवाज" – अशा घोषणा सुरू झाल्यात. संसार उद्ध्वस्त होण्याच्या कहाण्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. "दिवाळीनंतर लग्न ठरलं, पण पावसाने संकट आणलं", "लग्नाला वर आला, पण पिक गेलं म्हणून बापाला जीवावर आलं" – अशा गोष्टी लोक सांगतायत.


गावांचा संपर्क तुटला


पावसामुळे अनेक गावांचा रस्ता तुटलाय, वाहतूक थांबलीय, लोकं अडचणीत आहेत.


मागण्या


शेतकऱ्यांच्या मोठ्या मागण्या –


ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करा


संपूर्ण कर्जमाफी द्या


पीकविमा आणि अनुदान लगेच द्या



"शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली तरच बळीराजा वाचेल", "विमा कुणी खाल्लाय त्याचा हिशोब द्या" – असं लोकं स्पष्ट सांगतायत. जनावरं उपाशी, पिकं वाहून गेली, संसार उद्ध्वस्त – या सगळ्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड वेदना दाटल्यात.


"पोटच्या पोरासारखं सांभाळलेलं जनावरं आणि पीक डोळ्यादेखत वाहून जातंय… शेतकऱ्याच्या मनाला काय वाटत असेल?" – हा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात घर करून बसलाय.



Post a Comment

0 Comments