पंतप्रधानांकडे तक्रार कशी पाठवायची, काय असतो प्रोसीजर PM MODI NARENDRA MODI

पंतप्रधानांकडे तक्रार कशी पाठवायची, काय असतो प्रोसीजर PM MODI NARENDRA MODI 


पंतप्रधानांकडे तक्रार पंतप्रधान कार्यालयातून करता येते. सरकारी काम अडकलं असेल, काही योजना मिळत नसतील किंवा अजून काही तक्रार असेल तर ती थेट पीएमओकडे (पंतप्रधान कार्यालय) पोचवता येते.

आपल्याला माहितीच आहे की, अनेकदा सरकारी ऑफिसची धावपळ करूनही आपली कामं होत नाहीत. लोकांचं ऐकलं जात नाही. पण आता माणसाला थेट पंतप्रधानांपर्यंत आपली तक्रार पोचवायची सोय झालीये. त्यामुळे समस्या सोडवायला थोडं सोपं झालंय.


https://www.saamnews.in/


1. सर्वप्रथम प्रधानमंत्री कार्यालयाची अधिकृत वेबसाइट 👉 https://www.pmindia.gov.in/hi इथे जावं लागतं.


2. होमपेजवर "प्रधानमंत्रींसोबत संवाद करा" (Interact with Prime Minister) असा पर्याय दिसतो, तो सिलेक्ट करायचा.


3. मग "प्रधानमंत्रींना लिहा" (Write to Prime Minister) या ऑप्शनवर क्लिक करायचं.


4. त्यावर क्लिक केलं की CPGRAMS नावाचं पेज उघडतं. इथे आपली तक्रार टाकता येते.


5. तक्रार टाकल्यानंतर लगेच रजिस्ट्रेशन नंबर मिळतो. त्या नंबरवरून आपण आपल्या तक्रारीचं काय झालंय ते ट्रॅक करू शकतो.


6. तक्रारीसोबत हवे असल्यास संबंधित कागदपत्रं पण अपलोड करता येतात.






ऑनलाईन नको असेल तर अजून कसं करता येईल?

तक्रार थेट डाकाने पाठवता येते.
पत्ता:
प्रधानमंत्री कार्यालय, साउथ ब्लॉक, नवी दिल्ली – 110011

किंवा फॅक्सने पाठवता येते.
फॅक्स नंबर: 011-23016857





तक्रारीवर कारवाई कशी होते?

ऑनलाईन असो वा ऑफलाईन, आलेल्या सर्व तक्रारी पंतप्रधान कार्यालयात तपासल्या जातात. एक खास टीम असते जी ह्या तक्रारींवर लक्ष ठेवते.
ही टीम वेगवेगळ्या मंत्रालयं, विभाग किंवा राज्य सरकारांशी बोलून त्यावर उपाययोजना करते.

जर तक्रार योग्य वाटली तर ती CPGRAMS पोर्टलवरून थेट संबंधित विभागाला पाठवली जाते.

आपली तक्रार कुठपर्यंत आली आहे हे पाहण्यासाठी 👉 http://pgportal.gov.in/ViewStatus.aspx या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकला की स्थिती दिसते. तिथेच विभागानं काय कारवाई केली आणि त्यांचा प्रतिसाद काय आहे, हे सगळं रेकॉर्ड मिळतं.




👉 म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर – आपलं काम अडकून बसलं असेल तर आता आपण थेट पंतप्रधानांपर्यंत आपली गोष्ट पोचवू शकतो.

Post a Comment

0 Comments